ETV Bharat / international

‘टिकटॉकच्या शेअर विक्रीत अमेरिकेला मोठा हिस्सा मिळावा’

author img

By

Published : Aug 4, 2020, 2:06 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी सोमवारी संवाद साधला. ते म्हणाले, की चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला तुमची मुले कुठे आहेत, हे माहित आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

संग्रहित -डोनाल्ड ट्रम्प
संग्रहित -डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन – टिकटॉकच्या शेअर विक्रीत अमेरिकेला मोठा हिस्सा मिळावा, अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यांनी टिकटॉकला अमेरिकेच्या व्यवसायामधून बाहेर पडण्याची 15 सप्टेंबरची अंतिम मुदत दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी सोमवारी संवाद साधला. ते म्हणाले, की चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला तुमची मुले कुठे आहेत, हे माहित आहे. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही टिकटॉकला साईन केल्याने तुमचे नाव आणि पासवर्ड त्यांना कळते. टिकटॉकमध्ये किमान 30 टक्क्यांहून कमी हिस्सा खरेदी करू नये, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. कंपनीमधील कमी हिस्सा म्हणजे भाडेकरू असल्यासारखे आहे. भाडेकरुला किंमत नसते, असे ट्रम्प यांनी म्हटले. टिकटॉकच्या खरेदीबाबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्याशी डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चा केली आहे.

टिकटॉकमधील हिस्सा खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून बाईटडान्स कंपनीशी चर्चा सुरू आहे. मात्र, अमेरिकन कंपनीने टिकटॉकचा 100 टक्के हिस्सा खरेदी करावा, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे.

दरम्यान, टिकटॉकसह 59 चिनी अॅपवर भारताने बंदी लागू केली आहे. देशाचा सार्वभौमपणा, सुरक्षितता या कारणांमुळे भारताने चिनी अॅपवर बंदी लागू केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.