वॉशिंग्टन डी. सी. - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इराणला धमकीवजा शुभेच्छा दिल्या आहेत. इराणमधील अमेरिकी दूतावासावर आंदोलनकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी इराणला इशारा दिला. जर अमेरिकेच्या एकाही व्यक्तिला इजा झाली तर त्यासाठी इराणला जबाबदार धरले जाईल आणि त्यांना याची किंमतही चुकवावी लागेल, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवर म्हटले.
-
The U.S. Embassy in Iraq is, & has been for hours, SAFE! Many of our great Warfighters, together with the most lethal military equipment in the world, was immediately rushed to the site. Thank you to the President & Prime Minister of Iraq for their rapid response upon request....
— Donald J. Trump (@realDonaldTrump) December 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The U.S. Embassy in Iraq is, & has been for hours, SAFE! Many of our great Warfighters, together with the most lethal military equipment in the world, was immediately rushed to the site. Thank you to the President & Prime Minister of Iraq for their rapid response upon request....
— Donald J. Trump (@realDonaldTrump) December 31, 2019The U.S. Embassy in Iraq is, & has been for hours, SAFE! Many of our great Warfighters, together with the most lethal military equipment in the world, was immediately rushed to the site. Thank you to the President & Prime Minister of Iraq for their rapid response upon request....
— Donald J. Trump (@realDonaldTrump) December 31, 2019
मागील काही दिवसांपासून इराणमधील अमेरिकी दूतावासाबाहेर काही लोक आंदोलन करत आहेत. त्यांनी दूतावासावर दगडफेक करत, तोडफोड केली. याला उत्तर म्हणून ट्रम्प यांनी ट्विट केले. दूतावासातील सर्व लोक सुरक्षित असून, त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'चीन दडपशाहीतून स्वत:च्याच नागरिकांची ओळख आणि संस्कृती पुसून टाकतोय'
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मायकल पोम्पेओ यांनी दूरध्वनीवरून इराणचे पंतप्रधान आदिल अब्दुल महदी आणि राष्ट्रपती बरहाम सलिह यांच्याशी चर्चा केली. इराणच्या पंतप्रधानांनीही आंदोलकर्त्यांना बगदादमधील अमेरिकी दूतावासाबाहेरचा हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले.