वाशिंगटन: अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय (American foreign Ministry) ने यूक्रेन (Ukraine) मधील अमेरिकी दूतावासात (US Embassy) कार्यरत असणाऱ्या सर्व अमेरिकी कर्चाऱ्यांच्या कुटुंबाना रूसी हल्ल्यांचा वाढता धोका लक्षात घेता रविवारी देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंत्रालयाने कीवमधील अमेरिकन दूतावासातील कर्मचार्यांवर अवलंबून असलेल्यांना देश सोडण्याचा सल्ला दिला. दूतावासात काम करणारे अनावश्यक कर्मचारी सरकारी खर्चाने देश सोडू शकतात, असेही ते म्हणाले.
अमेरिकन सरकारने हे पाऊल अशावेळी उचलले आहे, जेव्हा युक्रेनच्या सीमेवर रुसच्या वाढत्या लष्करी उपस्थितीमुळे तणाव वाढला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन (US Secretary of State Anthony Blinken)आणि रूसचे परराष्ट्र मंत्री सर्गेइ लावरोवने तनाव कमी करण्यासाठी शुक्रवारी चर्चा केली. पंरतु या दरम्यान यश आले नाही.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱयांनी सांगितले की, कीवमधील दूतावास उघडे राहतील आणि या घोषणेचा अर्थ यूक्रेनमधून अमिरीकन अधिकाऱ्यांना काढले जाणार नाही. त्यांनी सांगितले की, या पावलावर खुप काळापासून चर्चा होत होती. याचा अर्थ असा नाही की, अमेरिका यूक्रेनच्या बाबतीतील समर्थन कमी करत आहे.