ETV Bharat / international

US Elections 2020 LIVE: नेवाडामध्ये मतमोजणी केंद्रांबाहेर सुरक्षा वाढवली.. - अमेरिका निवडणूक निकाल

US Elections 2020 LIVE
अमेरिका अध्यक्षीय निवडणूक निकाल
author img

By

Published : Nov 6, 2020, 10:17 AM IST

Updated : Nov 6, 2020, 12:54 PM IST

11:43 November 06

नेवाडा मतमोजणी केंद्रांबाहेर सुरक्षा वाढवली..

नेवाडामध्ये मतदानानंतर तिसऱ्या दिवशीही मतमोजणी सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदान प्रक्रिया थांबवण्याची मागणी केल्यानंतर अमेरिकेत ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. त्यातच नेवाडामध्ये जो बायडेन आघाडीवर आहेत. त्यामुळे, तेथील मतदान केंद्रांबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

10:28 November 06

'ट्रम्प यांचे दावे निराधार'; राष्ट्राध्यक्षांना घरचा आहेर..

बायडेन घोटाळे करुन ही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, हा दावा त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांच्या या टिप्पणीमुळे अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेची प्रतिमा खराब होत असल्याचे म्हणत पक्षाच्या सदस्यांनी ट्रम्प यांना घरचा आहेर दिला आहे.

10:27 November 06

पेन्सिल्व्हेनियामध्ये ट्रम्प यांची मागणी मान्य..

पेन्सिल्व्हेनियामध्ये मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची याचिका ट्रम्प कॅम्पेननी दाखल केली होती. या याचिकेस मंजूरी मिळाली आहे. मात्र, त्याचवेळी पेन्सिल्व्हेनियामध्ये बॅलेटद्वारे होणारे मतदानही थांबणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

10:24 November 06

जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये ट्रम्पना धक्का..

जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीबाबत याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, याठिकाणच्या न्यायाधीशांनी ट्रम्प यांच्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. मिशिनगमध्ये बायडेन यांनी विजय निश्चित केला आहे, तर जॉर्जियामध्ये या दोघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला असून बायडेन यांच्या विजयाची शक्यताही नाकारता येत नाही.

10:15 November 06

व्हाईट हाऊसचा दावेदार कोण?

मतदान झाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून मतमोजणी सुरू आहे. मात्र, कोणत्याही एका उमेदवाराला स्पष्ट बहुमत मिळाले नसून काही राज्यात मतदार कोणाल कौल देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रेट लेक राज्यात बायडेन यांचा विजय झाल्याने त्यांची मते २६४ वर पोहचली असून फक्त एका राज्यातील विजय त्यांना व्हाईट हाऊसची दारे खुली करेल. मतदानाची वेळ संपल्यानंतर मोजणीस आलेली मते ग्राह्य धरू नका, अशी ट्रम्प यांची मागणी आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे वक्तव्य केले असून 'मोजणी थांबवा' असे ट्विट वारंवार केले आहे.

10:14 November 06

मतमोजणी अद्यापही सुरू

जॉर्जिया, नेवाडा, नार्थ कॅरोलिना, आणि पेन्सल्वेनिया राज्यासह इतर काही राज्यात मतमोजणी अद्याप सुरू आहे. त्यामुळे अद्याप कोण पुढे जाईल हे चित्र स्पष्ट होत नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी कायदेशीर मार्ग स्वीकारत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मात्र, यामुळे ट्रम्प यांना विजयी होण्यास काही मदत मिळले की नाही, हे स्पष्ट नाही.

10:09 November 06

अमेरिका अध्यक्षीय निवडणूक : तिसऱ्या दिवशीही मतमोजणी सुरू..

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंगतदार झाली असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी मिशिगन आणि विस्कॉन्सिन राज्यात विजय मिळवला आहे. २०१६ च्या निवडणुकीत ही राज्ये रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात होती. या विजयानंतर ट्रम्प पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी झाली आहे. जो बायडेन यांना आत्तापर्यंत २६४ इलेक्टोरल व्होट्स मिळाले असून ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल व्होट्स मिळाले आहेत. विजयसाठी उमेदवाराला २७० इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे.

Last Updated : Nov 6, 2020, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.