वॉशिंग्टन [अमेरिका] - मंगळवारी (दि. 16 जून) गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन हाणामारीच्या घटनेनंतर अमेरिका या घटनेवर करडी नजर ठेवून आहे. त्याचबरोबर शांतीपूर्ण तोडग्याचे आम्ही समर्थन करतो, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
प्रत्यक्ष ताबा रेषेतील (एलएसी) गलवान खोऱ्यात चिनी सैन्याशी झालेल्या हिंसक चकमकीत सैन्याच्या 20 जवानांना वीरमरण प्राप्त झाल्याचे भारताने म्हटल्यानंतर काही तासांतच अमेरिकेने दोन्ही देशांनी शांतीपूर्ण तोडगा काढा,असे सांगितले.
भारत व चीनच्या सीमावादावर 2 जून,2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोलान्ड ट्रम्प यांच्या दुरध्वनीवरून चर्चा झाल्याचेही परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, यामध्ये दोन्ही सैन्यातील सैनिक मारले गेले आहेत.
दरम्यान, लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या या हाणामारीत यात भारतीय लष्करातील 20 जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास 43 सैनिक ठार झाले आहेत, तसेच त्यांचे अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत. एएनआयला सुत्रांनी ही माहिती दिल्याची माहिती दिली.
हेही वाचा - भारत-चीन सैन्याच्या हाणामारीत चीनचे ४३ जवान ठार