वाशिंग्टन (यूएसए) - अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे फेसबुक अकाऊंट दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. फेसबुकने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. या काळात त्यांच्या अकाऊंटचे पुन्हा मुल्यांकन केले जाणार असल्याचेही फेसबुकने म्हटले आहे.
कॅपिटॉल हिलवर झालेल्या हिंसाचारानंतर ट्विटर आणि युट्यूबने त्यांचे अकाऊंट निलंबित केले होते. याचवर्षी 6 जानेवारीला ट्रंप यांच्या हजारो समर्थकांनी कॅपिटॉल हिलवर दगडफेक केली होती. यात दुर्घटनेत चार जणांचा मृत्यूही झाला होता.
फेसबुकने काय म्हटले?
ट्रंप यांच्या निलंबनास कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, त्यांनी आमच्या नियमांचे कठोर उल्लंघन केले आहे. त्यामुळे ते नवीन अंमलबजावणी प्रोटोकॉल अंतर्गत सर्वात जास्त दंडास पात्र ठरतात. त्यामुळे आम्ही त्यांचे अकाऊंट दोन वर्षांसाठी निलंबित करत आहोत, असे फेसबुकच्या ग्लोबल अफेअर्सचे उपाध्यक्ष निक क्लेग यांनी शुक्रवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - आता चीनमध्ये ''हम दो हमारे तीन'', सरकारने दिली कुटुंब नियोजनात ढील
गेल्या महिन्यात, ओव्हरसाइट बोर्ड-सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर परिणामस्वरूप माहितीचे नियमन करणारे निर्णय घेणारी संस्थेने ट्रंप यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यावर निलंबनाला समर्थन दिले. अनिश्चित काळासाठी निलंबनाची अनिश्चित आणि प्रमाणित दंड आकारणे योग्य नाही, असेही बोर्डाने म्हटले आहे.
मंडळाने आम्हाला निर्णयाचे पुनरावलोकन करण्याची आणि स्पष्ट व प्रमाणित पद्धतीने प्रतिसाद देण्याची सूचना केली आणि आमची धोरणे व प्रक्रिया कशी सुधारित करावी यासाठी अनेक शिफारसी केल्या, असेही निक क्लेग म्हणाले. आम्ही आज यासारख्या अपवादात्मक प्रकरणांमध्ये नवीन अंमलबजावणी प्रोटोकॉल लागू करण्याची घोषणा करत आहोत. निलंबनाच्या या काळात त्यांच्या अकाऊंटचे पुन्हा मुल्यांकन केले जाणार असल्याचेही असेही ते म्हणाले.