ETV Bharat / international

अमेरिकेचे अध्यक्ष भारतासाठी 'दुधारी तलवार' : ज्येष्ठ पत्रकार अॅलन फ्रेडमॅन

author img

By

Published : Jul 28, 2019, 8:51 PM IST

वॉल स्ट्रीटच्या अतिरेकापासून ते अमेरिकेतील वाढत्या दारिद्र्यापर्यंत भयानक असमानतेची ज्वलंत कथा ओम बुक्स इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात फ्रेडमन यांनी सांगितली आहे. राजकारण, प्रशासकीय दृष्टिकोन आणि राष्ट्रवाद यांसारख्या विषयांबाबतीत ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मोठे साम्य असल्याचेही ते या पुस्तकात म्हणतात.

अमेरिकेचे अध्यक्ष भारतासाठी 'दुधारी तलवार' : ज्येष्ठ पत्रकार अॅलन फ्रेडमॅन

नवी दिल्ली - 'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारतासंबंधीची व्यापारविषयक धोरणे भारतासाठी फारशी हितकारक नाहीत', असे मत ज्येष्ठ पत्रकार अॅलन फ्रेडमन यांनी त्यांच्या 'डेमोक्रेसी इन पेरिलः डोनाल्ड ट्रम्प'स अमेरिका' या पुस्तकाद्वारे मांडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष भारतासाठी 'दुधारी तलवार' ठरू शकतील असेही अॅलन यांनी म्हटले आहे.

फ्रेडमॅन यांच्या मते, चीनबरोबर ट्रम्प यांचे व्यापार युद्ध आणि अनेक आंतरराष्ट्रीय करारांमधून घेतलेली माघार हे त्यांच्या प्रचार मोहिमेतील आश्वासनांशी सुसंगत असे निर्णय आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणात 'शत्रूचा शत्रू मित्र' या धोरणातून ट्रम्प भारताच्या बाजूने झूकत असले तरी, ते एक तडकाफडकी, अनपेक्षित आणि आक्षेपार्ह निर्णय घेणारी व्यक्ती आहेत.

ट्रम्प यांनी अनेक मार्गांनी जगात उलथापालथ केली असून राजकारण, प्रशासकीय दृष्टिकोन आणि राष्ट्रवाद यांसारख्या विषयांबाबतीत ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मोठे साम्य असल्याचेही ते या पुस्तकात म्हणतात.

वॉल स्ट्रीटच्या अतिरेकापासून ते अमेरिकेतील वाढत्या दारिद्र्यापर्यंत भयानक असमानतेची ज्वलंत कथा ओम बुक्स इंटरनॅशनलने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात फ्रेडमन यांनी सांगितली आहे.

Intro:Body:

international

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.