ETV Bharat / international

कोरोना परिस्थिती हाताळण्यात ट्रम्प प्रशासनाला अपयश - अँथनी फौसी

author img

By

Published : Jan 23, 2021, 5:50 PM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौसी यांनी अमेरिकेमध्ये निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीवरून, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी अमेरिकेत निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीसाठी ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे.

अँथनी फौसी
अँथनी फौसी

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौसी यांनी अमेरिकेमध्ये निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीवरून, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी अमेरिकेत निर्माण झालेल्या कोरोना परिस्थितीसाठी ट्रम्प यांना जबाबदार धरले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कशी हाताळावी, काय उपाय योजना कराव्यात? याबाबत ट्रम्प प्रशासनामध्ये सातत्याचा अभाव होता, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू

अमेरिकेमध्ये कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला, याला ट्रम्प प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला आहे. जेव्हा कोरोनाने अमेरिकेमध्ये शिरकाव केला, तेव्हा कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी अमेरिकन प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांमध्ये अनेक त्रुटी होत्या, निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली नाही, परिणामी देशात कोरोनाचा प्रसार अधिक तीव्रतेने झाला. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान कोरोना काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनला औषध म्हणून वापरण्यास मान्यता दिली, तेव्हा आपण अधिक अस्वस्थ झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कारण हायड्रॉक्सीक्लोरोक्विनमुळे कोरोनाला आळा घालण्यास कोणतीही मदत होणार नसताना हा निर्णय घेण्यात आला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.