वॉशिंग्टन - 'अमेरिकेच्या सैन्याने इराणच्या खास इस्लामी क्रांतिकारी सुरक्षा दलाच्या (IRGC - दि इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कोर) कासीम सुलेमानीचा खात्मा केला. ही कारवाई युद्ध थांबवण्यासाठी होती, सुरू करण्यासाठी नाही'; असे निवेदन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी जारी केले आहे.
हेही वाचा - बगदादमध्ये 'शिया सशस्त्र गटां'वर पुन्हा हवाई हल्ला; ६ ठार
'आम्ही काल रात्री केलेली ती कारवाई युद्ध थांबवण्यासाठी किंवा टाळण्यासाठी होती. युद्ध सुरू करण्यासाठी नव्हे. आम्हाला तेथे सत्ताबदल घडवून आणायचा नाही. मात्र, तेथील शासनाने तेथील प्रदेशात अवलंबलेला आक्रमक पवित्रा आणि शेजारील देशांना अस्थिर करण्यासाठी चालवलेली समांतर लढाऊ यंत्रणा थांबलीच पाहिजे.' असे ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कासीम सुलेमानी अमेरिकन अधिकारी आणि महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींना लक्ष्य करू पाहत होता, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - कोण होता अमेरिकन हल्ल्यात ठार झालेला इराणचा जनरल सुलेमानी?