ETV Bharat / international

अयोध्या राम मंदिर भूमीपूजन समारंभानिमित्त न्यूयॉर्कमध्ये उत्सव - अयोध्या राम मंदिर भूमीपूजन

भगवान राम आणि अयोध्यातील भव्य राम मंदिराची थ्रीडी पोर्ट्रेटची प्रतिमा आयकॉनिक टाईम्स स्क्वेअर येथे भव्यदिव्य होर्डिंग्जच्या माध्यमातून 5 ऑगस्टला सादर करण्यात येणार आहे. या दिवशी अयोध्येत मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. यावेळी होणारा कार्यक्रम ऐतिहासिक घटना म्हणून दाखवण्यात येणार आहे.

अयोध्या राम मंदिर न्यूज
अयोध्या राम मंदिर न्यूज
author img

By

Published : Jul 30, 2020, 5:43 PM IST

न्यूयॉर्क - भगवान राम आणि अयोध्यातील भव्य राम मंदिराची थ्रीडी पोर्ट्रेटची प्रतिमा आयकॉनिक टाईम्स स्क्वेअर येथे भव्यदिव्य होर्डिंग्जच्या माध्यमातून 5 ऑगस्टला सादर करण्यात येणार आहे. या दिवशी अयोध्येत मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. यावेळी होणारा कार्यक्रम ऐतिहासिक घटना म्हणून दाखवण्यात येणार आहे.

अमेरिकन इंडिया पब्लिक अफेयर्स कमिटीचे अध्यक्ष आणि प्रमुख नेते जगदीश सेव्हानी यांनी बुधवारी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत राम मंदिर बांधकामासाठी पायाभरणी करणार आहेत. 5 ऑगस्टला याच वेळी, न्यूयॉर्कमध्ये हा ऐतिहासिक क्षण साजरा करण्याची व्यवस्था केली जात आहे.

5 ऑगस्टला सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत भगवान राम यांची छायाचित्रे आणि व्हिडिओ, मंदिराचे डिझाइन आणि वास्तुकलेचे थ्रीडी पोर्ट्रेट्स तसेच मोदींनी पायाभरणी केल्याची छायाचित्रे अनेक होर्डिंग्जवर दाखविली जातील. यासाठी विविध महत्त्वाच्या ठिकाणची होर्डिंग्ज भाड्याने घेतली जात आहेत. त्यापैकी जगातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या टाइम्स स्क्वेअर येथे दाखवण्यात येणारे होर्डिंग सर्वात मोठे आणि खास असेल, असे सेव्हानी म्हणाले.

भारतीय समुदायाचे सदस्यही या समारंभाचे औचित्य साधून मिठाई वाटण्यासाठी टाईम्स स्क्वेअर येथे एकत्र जमतील, असे सेव्हानी म्हणाले. 'ही आयुष्यात एकदा किंवा शतकात एकदा नव्हे तर, मानवजातीच्या जीवनात एकदा घडणारी ही घटना आहे. रामजन्माच्या स्मरणार्थ आपल्याला टाइम्स स्क्वेअर येथे होणारा भूमी पूजन उत्सव खास असेल,' असे ते पुढे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.