वॉशिंग्टन (डी. सी.) - अमेरिकी संसदेच्या 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज'मध्ये आज पार पडलेल्या मतदानात, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाला मंजुरी मिळाली आहे. या सभागृहात २३० विरूद्ध १९७ मतांनी या प्रस्तावाला मान्यता मिळाली. सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल तसेच संविधानाचे उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यानंतर आता अमेरिकी संसदेच्या 'सिनेट'मध्ये याबाबत मतदान होईल.
-
The House of Representatives has passed two articles of impeachment against US President President Donald Trump. pic.twitter.com/4CKUtaFRSG
— ANI (@ANI) December 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The House of Representatives has passed two articles of impeachment against US President President Donald Trump. pic.twitter.com/4CKUtaFRSG
— ANI (@ANI) December 19, 2019The House of Representatives has passed two articles of impeachment against US President President Donald Trump. pic.twitter.com/4CKUtaFRSG
— ANI (@ANI) December 19, 2019
सिनेट देईल ट्रम्प यांच्या बाजूने मत, व्हाईट हाऊसचा विश्वास..
प्रतिनिधींच्या सभागृहाने जरी ट्रम्प यांच्या विरोधात मत दिले असले, तरी 'सिनेट' नक्कीच ट्रम्प यांच्या बाजूने मत देईल असा विश्वास व्हाईट हाऊसने व्यक्त केला आहे. महाभियोगाच्या पुढील प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
-
White House: President Donald Trump will continue to work tirelessly to address the needs and priorities of the American people, as he has since the day he took office. https://t.co/CUtPwEkNnt
— ANI (@ANI) December 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">White House: President Donald Trump will continue to work tirelessly to address the needs and priorities of the American people, as he has since the day he took office. https://t.co/CUtPwEkNnt
— ANI (@ANI) December 19, 2019White House: President Donald Trump will continue to work tirelessly to address the needs and priorities of the American people, as he has since the day he took office. https://t.co/CUtPwEkNnt
— ANI (@ANI) December 19, 2019
प्रतिनिधींच्या सभागृहात बहुमतात असलेला डेमोक्रॅटिक पक्ष, सिनेटमध्ये मात्र अल्पमतात आहे. त्यामुळे व्हाईट हाऊसचा हा दावा खरा ठरण्याची शक्यता जास्त आहे.