वॉशिग्टंन - कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर अमेरिकेमध्ये आंदोलन सुरू झाले आहे. अंदोलकांवर नियत्रंण मिळवण्यासाठी शहरामध्ये सैन्य पाठवण्यात यावेत, या आशयाचा लेख रिपब्लिकन सीनेट सदस्य टॉम कॉटनने लिहला होता. या लेखामुळे न्यूयॉर्क टाइम्सचे ओपिनियन संपादक जेम्स बेनेट यांनी राजीनामा दिला आहे.
'सेंड इन द ट्रूप्स’ हे त्यांच्या लेखाचे शिर्षक होते. हा लेख रविवारी रात्री वृत्तपत्राच्या वेबसाईटवर प्रकाशीत करण्यात आला होता. या लेखात ट्रम्प यांच्या धमकीचे समर्थन करण्यात आले होते. निदर्शनांमुळे होणार्या अशांततेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैन्याचा वापर करण्याबद्दल लेखात लिहले होते.
2016 पासून जेम्स बेनेट ओपिनियन संपादक होते. हा लेख प्रकाशित होण्यापूर्वी त्यांनी वाचला नव्हता, हे त्याने कबूल केले आहे. कंपनीतील 800 हून अधिक कर्मचार्यांनी लेखाला विरोध दर्शविणार्या एका पत्रकावर स्वाक्षरी केली असून या लेखात दिलेली माहिती दिशाभूल करणारी असल्याचं म्हटलं आहे.