लॉस एंजेलिस - लॉस एंजेलिस काउंटीमध्ये, दर मिनिटाला सरासरी 9 ते 10 लोक कोरोना विषाणूबाधित असल्याचे नव्याने आढळत आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा - जपानमध्ये अनिवासी परदेशी नागरिकांना बंदी, कोरोनाच्या 'युके स्ट्रेन'चे बाधित रुग्ण सापडल्यानंतर निर्णय
सिन्हुआ या वृत्तसंस्थेच्या अहवालात काऊंटीच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हवाला देऊन सोमवारी म्हटले आहे की, कोरोनाविषाणू तपासणी अहवालात सोमवारी 13 हजार 661 नवीन प्रकरणे नोंदली गेली असून एकूण प्रकरणांची संख्या वाढून 7 लाख 33 हजार 325 झाली आहे. त्याच वेळी, कोरोना विषाणूमुळे 73 लोक मरण पावले. ज्यामुळे मृत्यूंची संख्या 9 हजार 555 पर्यंत वाढली आहे.
सध्या रूग्णालयात 6 हजार 914 कोरोना रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 20 टक्के आयसीयूमध्ये दाखल आहेत.
हेही वाचा - हाँगकाँग : परदेशातून येणाऱ्यांसाठी कोविड-19 विलगीकरण कालावधी वाढला, 21 दिवस रहावे लागणार क्वारन्टाईन