वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेत कोरोनाचे संकट गंभीर होताना दिसत आहे. आत्तापर्यंत 3 लाख 77 हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांचा आकडा 10 हजार 495 झाला आहे. एकट्या न्यूयॉर्क शहरात मागील 24 तासात 731 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील न्युयॉर्क आणि आणि न्यूजर्सी शहरात सर्वात जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. न्यूयॉर्कमध्ये 1 लाख 38 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले असून सुमारे सात हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूजर्सी राज्यात 41 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. संपूर्ण अमेरिकेत 19 हजार 877 जणांचा मृत्यू झाला आहे.
डब्ल्यूएचओ संघटनेवर ट्रम्प यांची टीका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयांवरही टीका केली आहे. ' डब्ल्यूएचओला अमेरिका सर्वात जास्त निधी पुरविते. तरी ते चीन धार्जीने असल्यासारखे वागत आहेत. आम्ही यावर आता चांगलाच विचार करत आहोत. चीनमध्ये कोरोनाचा प्रसार होत असतानाही चीनी नागरिकांसाठी अमेरिकेने आपल्या सीमा उघड्या ठेवाव्यात, असा सल्ला आम्हाला डब्ल्यूएचओने दिला होता. मात्र, सुदैवाने आम्ही तो मान्य केला नाही. त्यांनी चुकीचे निर्देश का दिले, असा घणाघात ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघनटेवर केला आहे.