वॉशिंग्टन डी. सी. - कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी प्रामुख्याने केमोथेरेपीचा वापर केला जातो. ही उपचार पद्धती इतकी त्रासदायक आहे की, काही रूग्ण उपचार अर्ध्यातच सोडून देतात. मात्र, कॅन्सर रूग्णांसाठी एक आनंदाची बातमी संशोधकांकडे आहे.
जेरूसलेम मधील हिब्रू विद्यापीठातील काही संशोधकांनी केमोथेरेपीची औषधे देण्यासाठी एक नवीन आणि कमी त्रासदायक पद्धत शोधून काढली आहे. रूढ उपचार पद्धतीमध्ये केमोथेरेपीचे उपचार करताना कॅन्सरग्रस्त पेशींसोबतच शरीरातील इतर पेशींवर देखील औषधांचा मारा केला जातो. त्यामुळे रुग्णाला प्रचंड वेदना सहन कराव्या लागतात.
हेही वाचा - अमेरिकेत विमान अपघातात ९ जणांचा मृत्यू , तिघे गंभीर जखमी
संशोधकांनी शोधून काढलेल्या उपचार पद्धतीत औषधे थेट कॅन्सरग्रस्त पेशींमध्ये (घातक पेशी) दिली जातात. यामुळे ज्या निरोगी पेशी आहेत त्यांचा औषधांच्या माऱ्यापासून बचाव करता येतो, परिणामी केमोथेरेपीचे उपचार घेताना रुग्णाला कमी त्रास होईल, अशी माहिती संशोधक अलेक्झांडर बिन्स्टोक यांनी दिली.
हिब्रू विद्यापीठातील संशोधकांच्या पथकाने यकृताचा कॅन्सर झालेल्या रुग्णावर या नवीन उपचार पद्धतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या संशोधनाचा कॅन्सरग्रस्त रूग्णांना नक्कीच फायदा होईल.