ETV Bharat / international

लॉस एंजिलिसमध्ये इमारतीत स्फोट होऊन भीषण आग, नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाचे ११ जवान जखमी - Los Angeles Fire Department

शनिवारी संध्याकाळी लॉस एंजेलिसच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका इमारतीला भीषण आग लागली. आगीने थोड्याच वेळात आसपासच्या इमारतींनाही आपल्या विळख्यात ओढले. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून १ तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या कार्यात अग्निशमनचे जवळपास २३० जवान होते, ज्यापैकी ११ जवान हे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे.

लॉस एंजिलिसमध्ये इमारतीला भीषण आग
लॉस एंजिलिसमध्ये इमारतीला भीषण आग
author img

By

Published : May 17, 2020, 1:40 PM IST

लॉस एंजेलिस - येथील मध्यवर्ती भागातील इमारतीमध्ये शनिवारी संध्याकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. पाहतापाहता आगीने रौद्ररुप धारण करत जवळपासच्या इमारतींनाही आपल्या भक्ष्यस्थानी उतरवले. दरम्यान घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पथकाने पोहचून एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, या घटनेत अग्निशमनचे ११ जवान गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती विभागाने दिली आहे.

शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास लॉस एंजेलिसच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हॅश ऑईल उत्पादक इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. दरम्यान या आगीने रौद्ररुप धारण करत ती जवळपासच्या इमारतींमध्येही झपाट्याने पसरली आणि भडका उडाला. तर, या इमारतीतून स्फोट झाल्याचा आवाज आला आणि त्यानंतर अचानक आगीचा भडका उडाल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली. ही घटना जवळच असलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहे. यामध्ये इमारतीतून स्फोट होऊन काळा धुरासह आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे रेकॉर्ड झाले आहे. दरम्यान, या घटनेमध्ये आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलातील ११ जवान हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

या घटनेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवळपास २३० जवान हे कार्यरत होते. यातील ११ जवान हे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावरील उपचाराकरता एक विशेष वैद्यकीय चमू नेमण्यात आली असल्याचे अग्निशमन विभागामार्फत सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्या स्थितीबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, लॉस एंजेलिसचे महापौर एरिक गार्सेटी यांनी ट्विट करून 'आमचे लॉस एंजेलिस अग्निशमन दलाचे जवान हे साहसी आहेत' त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी त्यांचा जीव धोक्यात घातला. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या सध्याच्या परिस्थीतीबाबत आपण बारकाईन लक्ष देऊन असून सतत पाठपुरावा करत असल्याची माहिती गार्सेटी यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.