वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाखांच्या पुढे गेला आहे. तर 18 हजार 881 जणांचा मृत्यू झाला आहे. 28 हजार 200 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज(शनिवार) दिवसभरात 3 हजार नव्याने कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
भारताने नुकतीच अमेरिकेला हाड्रोक्लोरोक्लीन या गोळ्यांची मदत केली आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे औषधांची मदत करण्यासाठी विनंती केली होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यात अमेरिकन नागरिकांना यश येत असून अनेकांचे जीव वाचत आहेत, असे ट्रम्प पत्रकार परिषदेत म्हणाले.
अमेरिकेतल्या विविध राज्यांतील परिस्थीती
न्युयॉर्क - 1 लाख 72 हजार रुग्ण
न्यूजर्सी - 54 हजार रुग्ण
मिशिगन - 22 हजार रुग्ण
कॅलिफोर्निया - 21 हजार रुग्ण
मॅसाच्युसेट - 20 हजार रुग्ण
पेन्सेलवेनिया - 20 हजार रुग्ण