ETV Bharat / international

सासरेबुवा आता तरी माघार घ्या! जारेड कुशनरने घेतली ट्रम्प यांची भेट - जारेड कुशनर व डोनाल्ड ट्रम्प भेट

अमेरिक राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांचा विजय झाला आहे. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले आहे. मात्र, ट्रम्प पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. आता त्यांची समजूत घालण्यासाठी त्यांचे जावई पुढे सरसावले आहेत.

Jared Kushner
जारेड कुशनर
author img

By

Published : Nov 8, 2020, 3:49 PM IST

वॉशिंग्टन डी. सी. - डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष झाले. त्यांना 290 इलेक्ट्रोल व्होट्स मिळाले आहेत. त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केले. मात्र, ट्रम्प पराभव स्वीकारण्यास तयार नसून आपणच निवडणूक जिंकल्याचा दावा त्यांनी ट्विटरवरून केला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि वरिष्ठ सल्लागार जारेड कुशनर यांनी ट्रम्प यांची भेट घेतली आहे. त्यांनी आपला पराभव मान्य करावा, अशी विनंती कुशनर यांनी केल्याचे अमेरिकन माध्यमांनी सांगितले आहे.

'मतमोजणीच्या ठिकाणी निरीक्षण पथकास पाहणी करण्यास मज्जाव करण्यात आला. मी ही निवडणूक जिंकली असून मला ७ कोटी १० लाख वैध मते मिळाली आहेत. लाखो लोकांना खोट्या मतपत्रिका पाठवण्यात आल्या, असा दावा ट्रम्प यांनी केला असून निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या या दाव्यानंतर कुशनर यांनी त्यांची भेट घेतली आहे. निवडणुकीचा जो निर्णय आला आहे, तो तुम्ही मान्य करा, अशी विनंती कुशनर यांनी केल्याचे एका अमेरिकन माध्यमाने सांगितले आहे.

मत मोजणीला सुरुवात झाल्यापासून बायडेन आणि ट्रम्प यांच्यात किंवा दोन्ही बाजूच्या प्रचार अधिकाऱयांमध्ये कोणताही संपर्क झालेला नाही, असे बायडेन आणि कमला हॅरिस यांचे प्रचार व्यवस्थापक केट बेडिंगफील्ड यांनी स्पष्ट केले आहे. काल (शनिवारी) रात्री विजय घोषीत झाल्यानंतर बायडेन यांनी पहिले भाषण केले. त्यात त्यांनी ट्रम्प आणि रिपब्लिकन पक्षाचे नाव घेतले नाही. निवडून दिल्याबद्दल त्यांनी अमेरिक जनतेचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.