वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेमध्ये कोरोनामुळे हजारोंचा बळी गेला आहे. व्हाइट हाऊसमध्ये कोरोनाबाधित कर्माचारी आढळल्यानंतर खळबळ उडाली असून कर्मचार्यांमध्ये विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्पच्या खासगी सचिवालाही कोरोनाची लागण झाली आहे.
इव्हांका ट्रम्प यांची खासगी सचिव कोरोनाबाधित आढळल्यानंतर इव्हांका ट्रम्प आणि त्याचे पती जेरेड कुशनेर यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान इव्हांका ट्रम्प यांचा गेल्या एका आढवड्यापासून तीच्याशी संपर्क आला नसल्याची माहिती आहे.
दरम्यान अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांची प्रेस सेक्रेटरी कैटी मिलरही कोरोनाबाधित आढळली आहे. ती पेन्स यांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. दरम्यान गुरूवारी झालेल्या चाचणी अहवालात केटीला संसर्ग झाल्याचे आढळले नव्हते. व्हाईट हाऊसमध्ये एक अधिकारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह व्हाइट हाऊसमधील कर्मचाऱयांची दिवसातून एकदा चाचणी घेण्यात येत आहे. आतापर्यंत डोनाल्ड ट्रम्प यांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.