ETV Bharat / international

अमेरिकन अध्यक्षपद निवडणूक : इव्हांका ट्रम्प यांनी वडिलांच्या प्रचारासाठी जमवला 13 दशलक्ष डॉलर्सचा निधी

author img

By

Published : Nov 1, 2020, 8:05 PM IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या कन्या आणि व्हाईट हाऊसच्या ज्येष्ठ सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी 3 नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी वडिलांच्या प्रचारासाठी 13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची देणगी एका आठवड्यात जमा केली आहे. सप्टेंबरपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 'निवडणूक मोहिमे'द्वारे एकूण 25.14 कोटी डॉलर्स जमा केले आहेत. तर, त्यांचे डेमॉक्रेटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्याकडे 43.2 कोटी डॉलर्स रोख आहेत.

इव्हांका ट्रम्प
इव्हांका ट्रम्प

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या कन्या आणि व्हाईट हाऊसच्या ज्येष्ठ सल्लागार इव्हांका ट्रम्प यांनी 3 नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी वडिलांच्या प्रचारासाठी 13 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची देणगी एका आठवड्यात जमा केली आहे.

एका सरकारी सहाय्याने स्थानिक हिल न्यूज वेबसाइटला सांगितले की, इव्हांका ट्रम्प कॅलिफोर्नियातील माउंटन व्ह्यू आणि बेव्हरली हिल्स येथे 25 आणि 26 ऑक्टोबरला एक कोटी डॉलर्सचा निधी जमा करण्यात यशस्वी झाल्या आहेत.

हेही वाचा - अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 1 फेब्रुवारीपर्यंत 4 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज

ते म्हणाले की, इव्हांका यांनी डेट्रॉईटमधून 3 दशलक्ष डॉलर्स जमा केले. तर, 25 ऑक्टोबरपासून त्यांनी एकूण 11 कार्यक्रमांमध्ये उपस्थिती नोंदवली आहे.

सप्टेंबरपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 'निवडणूक मोहिमे'द्वारे एकूण 25.14 कोटी डॉलर्स जमा केले आहेत. तर, त्यांचे डेमॉक्रेटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्याकडे 43.2 कोटी डॉलर्स रोख आहेत.

तथापि, तोटा झाला असला तरी, ट्रम्प यांच्यासाठी सध्या सुरू असलेल्या निवडणूक मोहिमेमध्ये सामील असलेल्यांचा पूर्ण विश्वास आहे की, ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्षपदी निवडून आणण्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी त्यांच्याकडे पुरेसा निधी असेल.

हेही वाचा - 'मतमोजणीत घोळ होणार'... निवडणुकीआधी ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.