ETV Bharat / international

सीरियात इसिसशी (ISIS) संबंधित अद्यापही ३ हजार दहशतवादी अस्तित्वात - रशिया

'सीरियामध्ये इतर दहशतवादी गटांचीही संख्या मोठी आहे. यातील बहुतांशी शस्त्रसज्ज आहेत. यापैकी जभात अल नुस्रा या संघटनेकडे सर्वाधिक शस्त्रे आहेत,' असेही कुझमीन यांनी सांगितले.

इसिस
author img

By

Published : Aug 28, 2019, 8:28 AM IST

न्यूयॉर्क - सीरियात इसिस (ISIS) दहशतवादी संघटनेशी तब्बल ३ हजार दहशतवादी संलग्न असल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियाचे अमेरिकेतील उपप्रतिनिधी गेन्नाडी कुझमीन यांनी ही माहिती दिली. इसिस या संघटनेवर बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच, येथील इसिसचे जाळे पसरलेल्या प्रदेशांमध्ये अमेरिकेने लष्करी कारवाई केली होती. तरीही या संघटनेशी संबंधित दहशतवादी अजूनही इतक्या प्रमाणात कार्यरत असल्याचे रशियाने म्हटले आहे.

'सध्या इस्लामिक स्टेट किंवा इसिस या दहशतवादी संघटनेतील आणि त्यांनी नवी भरती करून घेतलेले असे एकूण ३ हजार दहशतवादी सीरियामध्ये आहेत,' असे कुझमीन यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले. इसिसचे जाळे पसरलेल्या प्रदेशांत लष्करी कारवाईनंतरही इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवादी कार्यरत असणे ही गंभीर बाब आहे.

'याशिवाय, सीरियामध्ये इतर दहशतवादी गटांचीही संख्या मोठी आहे. यातील बहुतांशी शस्त्रसज्ज आहेत. यापैकी जभात अल नुस्रा या संघटनेकडे सर्वाधिक शस्त्रे आहेत,' असेही कुझमीन यांनी सांगितले.

सध्या सीरियातील इसिसच्या प्रभावाखाली असलेले सर्व प्रदेश अमेरिकन नेतृत्वाखालील सैन्याने ताब्यात घेतले आहेत. तरीही इराकने या वर्षाच्या सुरुवातीला इसिस ही संघटना अद्याप या प्रदशात कार्यरत असल्याचा दावा केला होता. तसेच, या संघटनेद्वारे काही प्रमाणात हल्लेही घडवून आणले जात असल्याचे म्हटले होते.

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.