ETV Bharat / international

अमेरिकेत पाकिस्तानी दूतावासाबाहेर पाकिस्तान मुर्दाबादचे नारे; भारतीयांचे आंदोलन - दहशतवादी

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी दूतावासाबाहेर अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांनी शुक्रवारी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत पाकिस्तान जागतिक दहशतवादी, पाकिस्तान मुर्दाबाद यांसारख्या घोषणा दिल्या.

न्यूयॉर्क1
author img

By

Published : Feb 23, 2019, 9:53 AM IST

न्यूयॉर्क - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ येथे पाकिस्तानी दूतावासाबाहेर अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांनी शुक्रवारी आंदोलन केले. पाकिस्तानच्या भ्याड कारवायांचा यावेळी निषेध करण्यात आला. १०० हून अधिक अमेरिकेतील भारतीय नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत पाकिस्तान जागतिक दहशतवादी, पाकिस्तान मुर्दाबाद यांसारख्या घोषणा दिल्या. अनेक आंदोलक हातात फलक आणि भारताचा ध्वज धरुन घोषणाबाजी करत होते. पाकिस्तानने देशाची प्रगती करावी, दहशतवादाची नव्हे, पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा, पाकिस्तान जागतिक दहशतवादी आहे, पाकिस्तानने वस्तूंची निर्यात करावी, दहशतवादाची नव्हे, अशी वाक्ये फलकांवर लिहिण्यात आली होती. पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणेने परिसर दणाणून गेला.

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय संरक्षण दलातील सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यानंतर भारतामध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. शुक्रवारी अमेरिकेत झालेल्या आंदोलनावरून भारताबाहेरील भारतीय नागरिकही या विषयी किती संवेदनशील आहेत, हे दिसून आले.

Intro:Body:

अमेरिकेत पाकिस्तानी भारतीय नागरिकांचा निषेध मोर्चा... न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानी दूतावासाबाहेर १०० हून अधिक भारतीय नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा... 

अमेरिकेत पाकिस्तानी दूतावासाबाहेर भारतीय नागरिकांचा मोर्चा

न्यूयॉर्क - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ येथे पाकिस्तानी दूतावासा बाहेर अमेरिकेतल्या भारतीय नागरिकांनी शुक्रवारी मोर्चा काढला. पाकिस्तानच्या भ्याड कारवायांचा यावेळी निषेध करण्यात आला. १०० हून अधिक अमेरिकेतील भारतीय नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत पाकिस्तान जागतिक दहशतवादी, पाकिस्तान मुर्दाबाद यांसारख्या घोषणा दिल्या. अनेक आंदोलक हातात फलक आणि भारताचा ध्वज धरून घोषणाबाजी करत होते. पाकिस्तानने देशाची प्रगती करावी, दहशतवादाची नव्हे, पाकिस्तानने दहशतवाद थांबवावा, पाकिस्तान जागतिक दहशतवादी आहे, पाकिस्तानने वस्तूंची निर्यात करावी, दहशतवादाची नव्हे अशी वाक्ये फलकांवर लिहिण्यात आली होती. पाकिस्तान मुर्दाबाद घोषणे परिसर दणाणून गेला.  

जम्मू काश्मीरच्या पुलवाममध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणण्यात आला होता. या हल्ल्यात भारतीय संरक्षण दलातील सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यानंतर भारतामध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. शुक्रवारी अमेरिकेत झालेल्या आंदोलनावरून भारताबाहेरील भारतीय नागरिकही या विषयी किती संवेदनशील आहेत, हे दिसून आले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.