वॉशिंग्टन - अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका 17 वर्षीय मुलीने सुचवलेले नाव नासाच्या पहिल्या मंगळ हेलिकॉप्टरला देण्यात आले आहे. वनिजा रुपानी असे या मुलीचे नाव असून अमेरिकी स्टेट नोर्थ पोर्ट येथील अलबामा विद्यालयात ती शिकते.
नासाने आयोजित केलेल्या 'नेम द रोवर' स्पर्धेत तिने भाग घेतला होता. तिने पाठवलेल्या निबंधाच्या आधारे मंगळ हेलिकॉप्टरचे 'इंजनुइटी' नामकरण करण्यात आले आहे. नासाकडून मार्च महिन्यात यासाठी निबंध मागवण्यात आले होते. मंगळ मोहिमेत रोवरसोबत हे हेलिकॉप्टर मंगळावर जाणार आहे.
आमच्या मंगळ हेलिकॉप्टरला नाव मिळाले आहे. नेम द रोवर स्पर्धेद्वारे विद्यार्थिनी वनिजा रुपानी हिने दिलेल्या नावावरून इंजनुइटी असे नाव ठेवण्यात आले आहे, असे नासाने ट्विट करून सांगितले आहे.
कौतुकाची बाब म्हणजे, जवळपास 28 हजार स्पर्धकांमधून वनिजाचा निबंध नासाने निवडला. वनिजाला लहानपणापासूनच खगोलशास्त्रामध्ये आवड असल्याचे तिच्या आईने सांगितले. मंगळ हेलिकॉप्टर जुलै महिन्यात प्रक्षेपित केले जाणार आहे. ते फेब्रुवारी 2021 मध्ये मंगळ ग्रहावर उतरणे नियोजित आहे, असे नासाकडून सांगण्यात आले.
-
Our Mars helicopter will attempt the 1st powered flight on another world. I’m proud to name it Ingenuity.
— Jim Bridenstine (@JimBridenstine) April 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Ingenuity rarely gets far without perseverance, so it's fitting it will ride on @NASAPersevere & its name was chosen from “name the rover” finalists: https://t.co/dq9IKTBNOp pic.twitter.com/8BiCmLSRdu
">Our Mars helicopter will attempt the 1st powered flight on another world. I’m proud to name it Ingenuity.
— Jim Bridenstine (@JimBridenstine) April 29, 2020
Ingenuity rarely gets far without perseverance, so it's fitting it will ride on @NASAPersevere & its name was chosen from “name the rover” finalists: https://t.co/dq9IKTBNOp pic.twitter.com/8BiCmLSRduOur Mars helicopter will attempt the 1st powered flight on another world. I’m proud to name it Ingenuity.
— Jim Bridenstine (@JimBridenstine) April 29, 2020
Ingenuity rarely gets far without perseverance, so it's fitting it will ride on @NASAPersevere & its name was chosen from “name the rover” finalists: https://t.co/dq9IKTBNOp pic.twitter.com/8BiCmLSRdu