ETV Bharat / international

अमेरिकेत भारतीय वंशाचा डंका! 'व्हाइट हाउस'च्या माध्यम सचिव पदी वेदांत पटेल यांची निवड - हाऊस व्हाइट हाउस माध्यम सचिव पद

'व्हाइट हाउस'च्या माध्यम सचिव पदी भारतीय वंशाचे वेदांत पटेल यांची निवड झाली आहे. वेदांत पटेल यांनी यापूर्वी भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांच्यासोबत काम केले आहे.

वेदांत पटेल
वेदांत पटेल
author img

By

Published : Dec 19, 2020, 1:36 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाली आहे. बायेडन यांनी आपल्या 'व्हाइट हाउस'च्या माध्यम सचिव पदी भारतीय वंशाचे वेदांत पटेल यांची निवड केली आहे. वेदांत पटेल हे बायडेन यांच्या विश्वसनीय लोकांपैकी एक आहेत. बायडेन यांचा शपथविधी सोहळा जानेवारी महिन्यात होणार आहे. वेदांत पटेल हे शपथविधी सोहळ्याचे वरिष्ठ प्रवक्तादेखील आहेत.

वेदांत पटेल यांनी यापूर्वी भारतीय वंशाच्या अमेरिकन खासदार प्रमिला जयपाल यांच्यासोबत काम केले आहे. प्रमिला जयपाल यांचे ते माध्यम संचालक होते. बायडेन यांच्या प्रचार अभियानामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जो बायडेन यांनी व्हाइट हाऊस कम्युनिकेशन्स आणि प्रेस स्टाफसाठी एकूण 16 जणांची निवड केली आहे. त्यामध्ये वेदांत पटेल यांचा समावेश आहे.

एक अनुभवी टीम तयार करण्यासाठी 16 जणांची निवड करण्यात आली आहे. हे सदस्य राष्ट्रध्यक्ष आणि उपराष्ट्रध्यक्षाच्या वतीने सूचना आणि माहितीचे प्रसारण करण्यात आणि महामारी काळात जनतेचा विश्वास संपादन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असे व्हाइट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ रॉन क्ल‌ॅन यांनी सांगितले.

जो बायडेन 46 वे राष्ट्राध्यक्ष -

डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 290 इलेक्ट्रोल व्होट्स त्यांना मिळाली असून अमेरिकेत आता नव्या अध्यायाला सुरवात झाली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रध्यक्षपदाचा उमेदवाराचा तब्बल 74 दशलक्ष मतांनी विजयी झाला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान झाले होते. अटीतटीच्या लढतीत बायडेन यांनी रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले होते. आता त्यांचा पराभव झाल्याने आगामी काळात भारत आणि अमेरिका संबंध कशाप्रकारे कायम राहतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी सोहळ्यासाठी राष्ट्रपती कोविंद आज गोव्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.