वॉशिंग्टन डी. सी - भारतात नागरिकत्व सुधारणा कायद्याला कडाडून विरोध होत असला तरी अमेरिकेत राहणाऱ्या अनिवासी भारतीयांनी सीएए कायद्याला पाठिंबा दर्शवला आहे. अमेरिकेतील सियाटल, अटलांटा शहरामध्ये शनिवारी नागरिकांनी रॅली काढली.
हेही वाचा - 'आम्ही ८० तर तुम्ही १८ टक्के, सीएएला विरोध करू नका, नाहीतर...'
सीएएच्या समर्थनार्थ नागरिक रस्त्यावर उतरले होते. सीएए नागरी हक्कासांठी असून कट्टरतावादासाठी नाही, आरडोओरडा केल्याने खोटं सत्य होत नाही, सीएए सर्वसमावेशक आहे, भेदभाव करणारे नाही, असा मजकूर लिहलेले पोस्टर हातात घेऊन नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.
हेही वाचा - सीएएवर चर्चा करण्यासाठी यावं; पाहिजे तर इटालियन भाषेत अनुवाद करतो, शाहांचे राहुल गांधींना आव्हान
अटलांटामध्ये एका वृत्तवाहिनीच्या कार्यालयाबाहेर जमून सीएएच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. याआधी लंडन शहरामध्येही सीएए कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशीतील अल्पसंख्य नागरिकांची काळजी घेण्यासाठी भारत सरकारने चांगला निर्णय घेतला आहे, अशा घोषणा नागरिकांनी पार्लमेंट स्केअरमध्ये जमून दिल्या होत्या.