ETV Bharat / international

चीनला मागे टाकत संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगावर भारताची निवड! - संयुक्त राष्ट्र इकोसॉक

"प्रतिष्ठित अशा इकोसॉकमध्ये भारताची निवड झाली आहे. कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन (सीएसडब्ल्यू) चा भारत आता एक सदस्य झाला आहे. देशामध्ये स्त्री-पुरुष समानता आणि महिला सबलीकरणाबाबत सुरू असलेल्या कामांची ही पोचपावती आहे. देशाला दिलेल्या पाठिंब्यासाठी इतर सदस्यांचे आभार." अशा आशयाचे ट्विट करत टी. एस. त्रिमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.

India beats China, becomes member of UN's ECOSOC body
चीनला मागे टाकत संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगावर भारताची निवड!
author img

By

Published : Sep 15, 2020, 7:39 AM IST

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगावर भारताची निवड झाली आहे. विशेष म्हणजे, याठिकाणी निवड होण्याच्या स्पर्धेत चीनही होता, त्याला मागे टाकून आपली याठिकाणी निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेचा (इकोसॉक) एक भाग म्हणजे महिला आयोग (सीएसडब्ल्यू). देशाचे संयुक्त राष्ट्रांतील कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. त्रिमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.

"प्रतिष्ठित अशा इकोसॉकमध्ये भारताची निवड झाली आहे. कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन (सीएसडब्ल्यू) चा भारत आता एक सदस्य झाला आहे. देशामध्ये स्त्री-पुरुष समानता आणि महिला सबलीकरणाबाबत सुरू असलेल्या कामांची ही पोचपावती आहे. देशाला दिलेल्या पाठिंब्यासाठी इतर सदस्यांचे आभार." अशा आशयाचे ट्विट त्रिमूर्तींनी केले.

या पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भारत, चीन आणि अफगाणिस्तानचा समावेश होता. भारताने यात सर्वाधिक मते मिळवली, तर दुसऱ्या क्रमांकावर अफगाणिस्तान होते. चीनला एकूण मतांच्या निम्मी मतेही मिळाली नाहीत. यापुढे चार वर्षांसाठी भारत सीएसडब्ल्यूचा सदस्य असेल.

हेही वाचा : नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सरकार अनेक स्तरांवर काम करत आहे - पोखरियाल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.