ETV Bharat / international

पाक पंतप्रधान इम्रान खान डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार - pakistan

इम्रान खान आणि ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवादावर काय चर्चा होते? तसेच भारत-पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांवर काही चर्चा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इम्रान खान
author img

By

Published : Jul 11, 2019, 3:13 PM IST

वॉशिंग्टन - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. २२ जुलैला ही भेट होणार आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होऊ शकते. डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्यासंदर्भातले एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आले आहे.

दोन्ही देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार आहे. तसेच, दहशतवादाचा बीमोड करणे, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

'डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यातच इम्रान खान यांना अमेरिकेला बोलावले होते. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने इम्रान खान जाऊ शकले नाहीत. आता ही भेट २२ जुलै रोजी होणार आहे,' अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

अमेरिकेने भारताला कायमच आपला सच्चा मित्र मानले आहे, असा उल्लेख ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या G20 परिषदेत केला होता. आता इम्रान खान आणि ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवादावर काय चर्चा होते? तसेच भारत-पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांवर काही चर्चा होणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे

Intro:Body:

पाक पंतप्रधान इम्रान खान डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. २२ जुलै रोजी ही भेट होणार आहे. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध सुधारण्याबाबत या दोन देशांच्या प्रमुखांमध्ये चर्चा होऊ शकते. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इम्रान खान या दोघांची भेट होणार असल्यासंदर्भातले एक पत्र व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आलं आहे.

दोन्ही देशांमधली शांतता, स्थैर्य आणि आर्थिक मुद्द्यांवर या भेटीत चर्चा होणार असल्याचीही माहिती समजते आहे. त्याचप्रमाणे दहशतवादाचा बिमोड करणं, सुरक्षा, व्यापार या विषयांवरही चर्चा होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही या भेटीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की डोनाल्ड ट्रम् यांनी गेल्या महिन्यातच इम्रान खान यांना अमेरिकेला बोलावले होते. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने इम्रान खान जाऊ शकले नाहीत. आता ही भेट २२ जुलै रोजी होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेने भारताला कायमच आपला सच्चा मित्र मानलं आहे. तसा उल्लेखही ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या G 20 परिषदेतही केला होता. आता इम्रान खान आणि ट्रम्प यांच्या भेटीत दहशतवादावर काय चर्चा होते? तसेच भारत पाकिस्तानच्या बिघडलेल्या संबंधांवर काही चर्चा होणार का? हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.