ETV Bharat / international

बिडेन जिंकले तर, मला कदाचित देश सोडावा लागेल - ट्रम्प - अमेरिका निवडणूक लेटेस्ट न्यूज

'अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी तीन नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपले डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्याकडून हार पत्करावी लागली तर, आपल्याला कदाचित देश सोडावा लागेल,' असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विनोदाने म्हटले आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी उपराष्ट्रपतींनी तोडीस तोड उत्तर दिले आहे.

अमेरिका निवडणूक लेटेस्ट न्यूज
अमेरिका निवडणूक लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Oct 17, 2020, 6:41 PM IST

वॉशिंग्टन - 'अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी तीन नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपले डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रतिस्पर्धी जो बिडेन यांच्याकडून हार पत्करावी लागली तर, आपल्याला कदाचित देश सोडावा लागेल,' असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विनोदाने म्हटले आहे.

हिल न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी शुक्रवारी रात्री जॉर्जियातील मॅकन येथे झालेल्या प्रचार मोहिमेदरम्यान ही टिप्पणी केली.

'मी विनोद करणे योग्य नाही, पण आपणास माहीत आहे की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या राजकारणाच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवाराविरुद्ध लढा देणे हे माझ्यावर दबाव आणणारे आहे. मी हरलो तर... अशी आपण कल्पना करू शकता का? आयुष्यभर मी काय करावे? मी करणार आहे? मी असे म्हणतो आहे की, राजकारणाच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवाराकडून माझा पराभव होणे मला अजिबात आवडणार नाही,' असे ते म्हणाले. 'त्यामुळे कदाचित मला देश सोडावा लागेल? मला माहीत नाही,' असे ट्रम्प म्हणाले.

हेही वाचा - चीन-अमेरिका वाद : 'हाँगकाँगवासीयांना देश सोडायचा असेल तर, अमेरिकेत स्वागत'

ट्रम्प यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी उपराष्ट्रपतींनी तोडीस तोड उत्तर दिले आहे. ट्रम्प यांच्या टिप्पणीवर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी, 'मी जो बिडेन आहे आणि मी हा संदेश मंजूर करतो,' असे म्हटले आहे.

गेल्या महिन्यात उत्तर कॅरोलिनामधील एका मोर्चात ट्रम्प यांनी असेच विधान केले होते. 'जर मी त्यांच्याकडून (बिडेन) हरलो तर, मला काय करावे लागेल हे माहीत नाही. मी तुमच्याशी पुन्हा कधीही बोलणार नाही,' असे ते म्हणाले होते.

2016 मध्ये प्रचार करताना ट्रम्प म्हणाले होते की, जर त्यांनी अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन उमेदवारी गमावली तर, ते लोकांसमोर येणार नाहीत.

हेही वाचा - चीनची युद्धाची खुमखुमी; शी जिनपिंग यांनी सैन्यदलाला 'हे' केले आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.