वॉशिंगटन डी. सी. - अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे हॉलोवीन उत्सवाच्या निमित्ताने आयोजित पार्टीमध्ये अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री १०.४५ वाजता ओरिंडा येथील एका मोठ्या घराच्या आवारामध्ये १०० पेक्षा जास्त जण पार्टीसाठी जमले असताना अंदाधुंद गोळीबाराची घटना घडली.
-
Four people have been killed in a Halloween night shooting in Orinda, California: The Associated Press
— ANI (@ANI) November 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Four people have been killed in a Halloween night shooting in Orinda, California: The Associated Press
— ANI (@ANI) November 1, 2019Four people have been killed in a Halloween night shooting in Orinda, California: The Associated Press
— ANI (@ANI) November 1, 2019
शुक्रवारी सकाळी पोलिसांनी ४ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. गोळीबारानंतर जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्यापपर्यंत हल्लेखोराचा तपास लागलेला नाही. गोळीबारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यावेळी मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे.