पोर्ट अँजेल्स - वॉशिंग्टनमधील पोर्ट अँजेल्स येथील सॅन जुआन द फुका या सामुद्रधुनी येथे राखाडी रंगाचा व्हेल मासा आढळून आला. यावेळी काही मच्छीमारांनी त्या माशाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बचाव दलाच्या मदतीने त्या माशाला वाचविण्यात आले.
वॉशिंग्टन येथील नैसर्गिक साधनसंपत्ती विभागाने ट्विटद्वारे सांगितले, की त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सकाळी राखाडी रंगाचा व्हेल मासा दिसला. त्यावेळी काही मच्छमार त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, काही सरकारी संस्थांच्या मदतीने त्याला मच्छीमारांच्या जाळ्यातून वाचविण्यात आले.