वॉशिंग्टन डी.सी - चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूचा विळखा घट्ट होत चालला आहे. गेल्या 24 तासांत जगभरामध्ये 3 लाख 12 हजार 924 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या 3 कोटी 44 लाख 79 हजार 555 वर पोहचली आहे. तर, 8 हजार 782 नव्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण बळींची संख्या 10 लाख 27 हजार 653 वर पोहचली आहे.
![Global COVID-19 tracker](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9018349_trace.jpg)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि त्यांच्या पत्नी मिलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्रम्प यांनी ट्विट करत सांगितले. तथापि, अमेरिकेत 74 लाख 94 हजार 371 जण बाधित झाले असून 2 लाख 12 हजार 660 जणांचा मृत्यू झाला आहे.