ETV Bharat / international

जगभरात 1 कोटी 77 लाख 66 हजार 840 जणांना संसर्ग

जगभरात 1 कोटी 77 लाख 66 हजार 840 जणांना संसर्ग झाला आहे. तर 6 लाख 83 हजार 218 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 1 कोटी 11 लाख 66 हजार 333 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

 जागतिक कोरोना अपडेट
जागतिक कोरोना अपडेट
author img

By

Published : Aug 1, 2020, 2:50 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या प्रसरारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत 2 लाख 90 हजार 735 कोरोना रुग्ण आढळले असून 3 हजार 459 जणांचा मृत्यू झाला आहे.

जगभरात 1 कोटी 77 लाख 66 हजार 840 जणांना संसर्ग झाला आहे. तर 6 लाख 83 हजार 218 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 1 कोटी 11 लाख 66 हजार 333 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोना रुग्णांची जागतिक आकडेवारी
कोरोना रुग्णांची जागतिक आकडेवारी

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 47 लाख 5 हजार 889 ऐवढी असून 1 लाख 56 हजार 747 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर ब्राझिल दुसऱया क्रमाकांवर असून 26 लाख 66 हजार 298 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 92 हजार 568 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.

भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण 16 लाख 95 हजार 988 इतकी झाली असून भारत तिसऱया क्रमांकावर आहे. भारतापाठोपाठ रशिया, दक्षिण अफ्रिका आणि पेरूमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या प्रसारास सुरवात झालेल्या चीनमध्ये पुन्हा कोरोना रुग्ण आढळत आहेत. देशाच्या उत्तर पूर्वेकडील झिंजियांग प्रांतात मागील काही आठवड्यांत रुग्णांत वाढ झाली आहे. मात्र, अमेरिका, भारत, ब्राझील या देशांच्या तुलनेत चीनमधील रुग्ण संख्या कमी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.