वॉशिंग्टन डी. सी - कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये 1 कोटी 19 लाख 41 हजार 783 हजार कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 5 लाख 45 हजार 652 जणांचा बळी गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, 68 हजार 44 हजार 973 जण बरे झाले आहेत.
कोरोनाचा फटका अमेरिकेला सर्वांत जास्त बसला असून इतर देशांच्या तुलनेत अमेरिकेतील मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. अमेरिकेत 30 लाख 97 हजार 84 जणांना कोरोनाची बाधा असून 1 लाख 33 हजार 972 जणांचा बळी गेला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 66 हजार 868 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 लाख 74 हजार 655 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापाठोपाठ रशिया, भारत, पेरू, स्पेनमध्ये कोरोना रुग्ण आढळले आहेत.
जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असताना, यूस, भारत, डेन्मार्क, इटली या देशांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्याने नागरिकांचा रस्त्यावरील वावर वाढला तर कोरोनाचा समूह संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.