ETV Bharat / international

कोरोनाचा विस्फोट! जगभरात 1 कोटी 7 लाख 93 हजार 359 कोरोनाग्रस्त - जगभरात कोरोनाचे मृत्यू

तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 5 लाख 18 हजार 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर तब्बल 1 कोटी 7 लाख 93 हजार 359 जण कोरोनाबाधित आहेत.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Jul 2, 2020, 11:49 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 5 लाख 18 हजार 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अधिक चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर तब्बल 1 कोटी 7 लाख 93 हजार 359 जण कोरोनाबाधित आहेत. यात दिलासादायक बाब म्हणजे, 59 लाख 30 हजार 131 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

अमेरिकेत जवळपास 27 लाख 78 हजार 467 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 30 हजार 789 जणांचा बळी गेला आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये 14 लाख 53 हजार 369 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 60 हजार 713 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. यापाठोपाठ रशिया, भारत आणि यूके, स्पेनला कोरोनाचा फटका बसला आहे.

जॉन हॉपकिन्सने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील कॅलिफोर्निया, अर्कांन्सस, मिसुरी, कान्सास, टेक्सास, फ्लोरिडा या राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरच्या थंड वातावरणात साथीच्या आजाराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, असे स्पॅनिश फ्लूचा संदर्भ देताना जागतिक आरोग्य संघटनचे सहायक महासंचालक रानेरी गुएरा म्हणाले.

जगभरात कोरोनाची लस आणि उपचार शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी मोठे बजेट लागणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, जर ही गुंतवणूक केली नाही. तर कोरोनाशी लढण्याकरता व त्यानंतर अपयश आल्यास त्याहून मोठा खर्च होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.