वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 2 लाख 98 हजार कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. यामध्ये सर्वात जास्त 85 हजार मृत्यू अमेरिकेमध्ये झाले आहेत.
तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 44 लाख 29 हजार 235 कोरोनाबाधित आढळले असून 2 लाख 98 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 16 लाख 58 हजार 995 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.
अमेरिकेतील रुग्णांची संख्या 14 लाख 30 हजार 348 कोरोनाबाधित असून 85 हजार 197 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेन, इटली आणि इंग्लमध्येही २ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 30 हजारपेक्षाअधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे.
अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची
कशी संपते कोरोना साखळी -
एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसात एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.