हैदराबाद - जगभरातली कोरोनाग्रस्तांनी ४० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. अद्ययावत आकडेवारीनुसार जगभरात ४० लाख १३ हजार ८९६ जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर १३ लाख ८५ हजार ४१२ जण पूर्णत: बरे झाले आहेत.
जागतिक स्तरावर २ लाख ७६ हजार नागरिक कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत. सर्वात जास्त म्हणजे ७८ हजारांपेक्षा जास्त बळी अमेरिकेत गेले आहेत. अमेरिकेतील रुग्णांची संख्या १३ लाखांच्या पुढे गेली आहे. तर स्पेन, इटली आणि इंग्लमध्येही २ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची जागतिक आकडेवारी