ETV Bharat / international

कमला हॅरिस यांच्या विजयाबद्दल त्यांच्या मामी म्हणाल्या... - जो बायडेन

कमला हॅरिस यांच्या विजयाबद्दल त्यांच्या मामी डॉ. सरला गोपालन यांनी आनंद व्यक्त केला. आता तिच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याची आशा असल्याचे डॉ. गोपालन म्हणाल्या.

Kamala Harris
कमला हॅरिस
author img

By

Published : Nov 8, 2020, 4:47 PM IST

चेन्नई (तामिळनाडू) - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडेन राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय-अमेरिकी वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदी विराजमान होतील. कमला हॅरिस यांच्या विजयाबद्दल त्यांच्या मामी डॉ. सरला गोपालन यांनी आनंद व्यक्त केला. आता कमला हॅरिस'च्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याची आशा असल्याचे डॉ. गोपालन म्हणाल्या.

डॉ. गोपालन म्हणाल्या, शनिवारी हॅरिसशी बोलता आले नाही. कारण तिने संपूर्ण दिवस आपल्या विजयाच्या घोषणेत घालविला. डॉ गोपालन एका स्वयंसेवी आरोग्य सेवेत वरिष्ठ सल्लागार आहेत. त्या म्हणाल्या, मी रात्री उशिरापर्यंत हॅरिस यांच्या विजयाच्या घोषणेची प्रतीक्षा करत होते.

पहिल्या कृष्णवर्णीय वंशाच्या महिला उपराष्ट्राध्यक्ष -

कमला ह‌ॅरीस या उपाध्यक्षपदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय वंशाच्या महिला ठरणार आहेत. कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकन वंशाच्या आहेत. त्यांचा जन्म कॅलिफोर्नियाच्या ऑकलँडमध्ये झाला. कमला यांच्या आई श्यामला गोपालन या मूळच्या तामिळनाडूतील होत्या. मात्र, शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्यानंतर त्या तिकडेच स्थायिक झाल्या होत्या.

कमला हॅरिस यांनी मतदारांचे मानले आभार-

डेमोक्रॅटिक पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बायडेन-हॅरिस यांचे समर्थक विल्मिंग्टनमध्ये एकत्र आले. भारतीय प्रमाणवेळेसुमार रविवारी सकाळी 7 वाजता कमला हॅरिस यांनी अमेरिकन देशवासीयांना संबोधित केले. यावेळी कमला हॅरिस यांनी मतदारांचे आभार मानले. तुम्ही सर्वांनी आशा, शालीनता, विज्ञान आणि सत्यांची निवड केली आहे, असे त्या म्हणाल्या.

'स्पष्टपणे मतदान करत, तुम्ही नव्या राष्ट्रध्यक्षपदी बायडेन यांना निवडलंय. अमेरिकेसाठी आज एक नवा दिवस उजाडला आहे. तसेच मी या कार्यालयातील पहिली महिला असेन. मात्र, मी शेवटची होणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

आता खरी कामे सुरू झाली आहेत. साथीच्या रोगाचा नाश, अर्थव्यवस्थेची पुन्हा उभारणी, आपल्या न्यायव्यवस्थेत आणि समाजात पद्धतशीर वर्णद्वेषाचे उच्चाटन, ही कामे करायची आहेत. येथून पुढचा रस्ता सोपा राहाणार नाही. मात्र, अमेरिका तयार आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा- अमेरिकेच्या नव्या कारभाऱ्यांचे पहिले भाषण... स्पष्ट बहुमताबद्दल नागरिकांचे मानले आभार

हेही वाचा- 'उपराष्ट्राध्यक्ष पदावरील मी पहिली महिला, अमेरिकेच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.