न्यूयॉर्क - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. डोनाल्ड ट्रम्प यांना वॉशिंग्टनमधील मुख्य सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते आता या दवाखान्यात राहून त्यांचे कामकाज करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
बायोटेक कंपनी, रेजेनरॉनद्वारे उत्पादित केलेले औषध सध्या ट्रम्प घेत आहेत, असे त्यांचे डॉक्टर शॉन कॉनले यांनी शुक्रवारी सांगितले होते. व्हाईट हाऊसमध्ये रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये अनौपचारिकरित्या बोलताना ट्रम्प म्हणाले, "मी वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये जात आहे. मला चांगले वाटत आहे, परंतु आम्ही खात्री करून घेत आहोत की, सर्व गोष्टी योग्य आहेत. प्रथम लेडी मेलानियाही ठीक आहेत.
हेही वाचा - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मिलेनिया ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह!
ट्रम्प यांची पत्नी मेलानिया मात्र सध्या व्हाईट हाऊसमध्ये विलगीकरणात आहेत. ट्रम्प यांचे प्रवक्ते केलेग मॅकेन्नी म्हणाले की, अध्यक्ष ट्रम्प सध्या पूर्ण ताजेतवाने दिसत आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असली तरी ते दिवसभर कार्यरत आहेत. ट्रम्प यांच्या आगामी प्रचार-प्रसार योजना सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. मोहिमेचे वरिष्ठ सल्लागार कोरी लेवँडोव्स्की यांनी याबाबत माहिती दिली.