ETV Bharat / international

कोरोनाच्या भीतीनं हस्तांदोलन टाळत डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नमस्कार - कोरोना व्हायरस

कोरोनाचा आजार साथीचा आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो. नाका, तोंडाला हात लावणेही टाळावे. कारण अस्वच्छ हाताद्वारे कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करु शकतो.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : Mar 13, 2020, 8:55 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे सर्वजण आरोग्याच्या सुरक्षिततेवर भर देत आहेत. वैयक्तीक स्वच्छतेबरोबरच एकमेकांशी संपर्क टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा वेळी हस्तांदोलन न करता हाताने नमस्कार करण्याची पद्धत परदेशातही रुढ होताना पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच हस्तांदोलन करण्याएवजी भारतीय पद्धतीने नमस्कार करणे पसंद केले.

  • #WATCH US President Donald Trump: We (him&PM of Ireland) didn't shake hands today&we looked at each other&said what are we going to do?Sort of a weird feeling. We did this (joined hands). I just got back from India&I didn't shake any hands there. It was easy. #CoronaVirusPandemic pic.twitter.com/5uTSKTf7bO

    — ANI (@ANI) March 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच आयर्लंडच्या पंतप्रधानांची भेट घेतली. आम्ही दोघांनीही हस्तांदोलन केले नाही. त्यामुळे आम्हाला अवघडल्यासारखे वाटले. मग आम्ही भारतीय पद्धतीने एकमेकांना नमस्कार केला. मी नुकताच भारताल भेट देऊन आलो आहे. मी तेथेही कोणाबरोबरही हस्तांदोलन केले नाही. नमस्कार घालणे खूप सोप्पे आहे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

कोरोना साथीचा आजार असल्याने एकमेकांच्या संपर्कात आल्याने पसरू शकतो. नाक, तोंडाला हात लावणेही टाळावे. कारण अस्वच्छ हाताद्वारे कोरोनाचा विषाणू शरिरात प्रवेश करु शकतो. याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आहावन प्रत्येक देशाकडून करण्यात येत आहे. याबाबत आरोग्य विभागांनी नियमावली जारी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.