वॉशिंग्टन - कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या साथीच्या आजाराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. येथील संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1 फेब्रुवारी 2021 पर्यंत 4 लाखांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात नुकत्याच लावण्यात आलेल्या अंदाजात ही बाब समोर आली आहे.
हेही वाचा - फ्रान्सची द्वेषयुक्त ट्वीटबद्दल महाथिर यांचे ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी
शुक्रवारी वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या इन्स्टीट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युएशन (आयएचएमई) संस्थेने वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार कोविड - 19 मुळे जानेवारीच्या मध्यापर्यंत दररोज 2 हजार 250 लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता सिन्हुआच्या अहवालात समोर आली आहे. सध्या येथील दररोज होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 800 आहे. तर, वर्तवलेल्या अंदाजात ते त्याच्या तिप्पट होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.
या अंदाजानुसार, 1 फेब्रुवारीपर्यंत मृतांचा आकडा 3 लाख 99 हजार 163 वर पोहोचण्याची शक्यता आहे.
सुरक्षिततेच्या उपायांचे योग्य पालन केले गेले नाही किंवा हे नियम शिथिल केले गेले तर, 1 फेब्रुवारीपर्यंत या आकड्यात 5 लाख 13 हजारांपेक्षा जास्त वाढ होऊ शकते, असे यात म्हटले आहे.
या अंदाजानुसार असेही म्हटले आहे की, 95 टक्के लोक नियमितपणे मास्क वापरत असतील तर, मृत्यूंची संख्या 3 लाख 37 हजार 600 पर्यंत राहील.
हेही वाचा - 'पत्नी बुशरा बीबीशिवाय मी जगू शकत नाही', पाक पंतप्रधान इम्रान खान