न्यूयॉर्क - शहरातील कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह येण्याची दिवसाची सरासरी वाढून 9 टक्क्यांच्या पुढे गेली आहे. येथील पॉझिटिव्हिटी दर 9.41 लागला. त्याआधीच्या दिवसापर्यंत तो 8.87 टक्के होता. शहराचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी ही माहिती दिली.
वृत्तसंस्था सिन्हुआच्या मते, 31 डिसेंबरला हा दर 8 टक्के आणि 27 डिसेंबरला 7 टक्के दर होता. नोव्हेंबरच्या अखेरीस हा दर केवळ 3 टक्क्यांवर होता. तेव्हाही शहरात कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याचे चिन्ह मानले जात होते. आता तरी आधीपेक्षा ही आकडेवारी खूपच अधिक आहे.
महापौरांनी सांगितले की, 'शहरात 219 नवीन रुग्ण रुग्णालयात दाखल झाले असून कोरोना विषाणूची 3,419 नवीन रुग्ण सापडले आहेत. 2021 साल सुरू झाले आहे आणि आमच्या शहरासाठी हे एक चांगले वर्ष असेल अशी आशा आहे. परंतु, आम्हाला कोविड-19 च्या विरोधात लढा सुरूच ठेवावा लागेल.'
हेही वाचा - न्यूयॉर्क शहरात 14 मार्च हा कोविड-19 स्मृतिदिन म्हणून पाळला जाणार
गुरुवारी नववर्षाच्या स्वागताला न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सद्वारे नवीन वर्ष साजरे करण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा यावर्षीही कायम ठेवली. मात्र, हा कार्यक्रम थेट पाहण्यास तेथे नेहमीप्रमाणे मोठा प्रेक्षकवर्ग नव्हता.
महापौरांनी ट्वीट केले, 'न्यूयॉर्क सिटीला नववर्षाच्या शुभेच्छा! एक शहर म्हणून, एक समुदाय म्हणून यावर्षी आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे. न्यूयॉर्क शहर पूर्वीपेक्षा अधिक बळकट होईल, असा आपला निर्धार आम्ही सिद्ध केला आहे.'
गुरुवारी, डी ब्लासिओ यांनी न्यूयॉर्क शहरात 14 मार्च हा कोविड-19 स्मृती दिन म्हणून स्मरणात ठेवण्याची घोषणा केली. याच दिवशी मागील वर्षी पहिला कोरोनाबाधित रुग्ण शहरात मरण पावला.
हेही वाचा - ब्रिटनमध्ये कोविड रुग्णसंख्येत 24 तासांत नोंदवली सर्वाधिक वाढ