ETV Bharat / international

कोविड - 19 च्या आकडेवारीचा कॅनडात नवा विक्रम

author img

By

Published : Dec 6, 2020, 8:04 PM IST

कॅनडामध्ये अशी पहिलीच वेळ आहे, जेव्हा येथे एका दिवसात एका प्रांतात दोन हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. याआधी, क्युबेकमध्ये 1 डिसेंबरला याआधीचा 1 हजार 513 चा उच्चांक गाठला होता. त्याचप्रमाणे, ओंटारियो प्रांतातही शनिवारी 1 हजार 859 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एका दिवसात आढळलेल्या रुग्णांचा विक्रम मोडला आहे.

कॅनडा लेटेस्ट कोरोना अपडेट
कॅनडा लेटेस्ट कोरोना अपडेट

ओटावा - कोविड - 19 रुग्णांच्या संख्येने कॅनडामध्ये नवीन विक्रम नोंदवले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या 4 लाख 6 हजार 839 आणि मृतांची संख्या 12 हजार 583 वर पोहोचली आहे.

क्यूबेकमध्ये शनिवारी आतापर्यंतची 24 तासांतील सर्वाधिक 2 हजार 31 रुग्णांची नोंद झाल्याची माहिती सिन्हुआने दिली आहे.

हेही वाचा - तुर्कीमध्ये 24 तासांतील सर्वाधिक कोविड-19 रुग्णांची नोंद

कॅनडामध्ये अशी पहिलीच वेळ आहे, जेव्हा येथे एका दिवसात एका प्रांतात दोन हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. याआधी, क्युबेकमध्ये 1 डिसेंबरला याआधीचा 1 हजार 513 चा उच्चांक गाठला होता. त्याचप्रमाणे, ओंटारियो प्रांतातही शनिवारी 1 हजार 859 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, एका दिवसात आढळलेल्या रुग्णांचा विक्रम मोडला आहे.

कॅनडाच्या मुख्य सार्वजनिक आरोग्य अधिकारी थेरेसा टॅम यांनी शनिवारी सांगितले की, कॅनडा कोविड - 19ची लस आणण्याची तयारी करत असला, तरी संपूर्ण प्रक्रिया चालविण्यात अनेक लॉजिस्टिक व ऑपरेशनल आव्हाने असतील. तोपर्यंत, कॅनडावासियांनी यापूर्वी वापरात असलेल्या सार्वजनिक आरोग्य उपायांद्वारे कोरोन विषाणूशी लढा चालू ठेवावा.

हेही वाचा - इराणमध्ये कोविड रुग्णांची संख्या 9 लाखांच्या पुढे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.