न्यूयॉर्क - अमेरिकेत कोरोनाबाधइत रुग्णांची साडेपाच लाखांवर पोहोचली आहे. जॉन हॉकिंन्स युनिवर्सिटीच्या सेंटर ऑफ सिस्टीम सायन्स अँड इंजिनियरींग विभागाने ही माहिती दिली आहे. तर, आतापर्यंत २१ हजार ७३३ जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
न्यूयॉर्क शहरात १ लाख ८९ हजार २० जण कोरोनाबाधित आहेत. ही संख्या देशातील सर्वाधिक आहे. तर, न्यूयॉर्कमध्ये मृतांची संख्या ९ हजार ३८५ आहे. तर, न्यू जर्सी शहरात ६१ हजार ८५० रुग्ण आहे. मिशीगन, पेनिसेल्विया, केलिफोर्निया, इलिनॉइस आणि लुइजिनीया या शहरांमध्ये प्रत्येकी २० हजारांपेक्षा अधिक रुग्ण असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आणि देणगीदार कोरोनाची लागण झाल्यानंतर कोमामध्ये होते त्यांचा मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कच्या रिअल इस्टेट उद्योगाचे व्यापारी स्टेनली चेरा यांचा शनिवारी मृत्यू झाला. रविवारी व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने चेरा यांची ओळख आणि राष्ट्रपतींशी असलेले संबंध याची माहिती दिली. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ट्रम्प यांच्या वैयक्तिक मैत्रीविषयी माहिती दिली.
नुकतच ट्रंम्प यांनी त्यांचे एक मित्र कोरोनामुळ आजारी पडल्याचे व्हाईट हाऊसमध्ये सांगितले होते.