ETV Bharat / international

भारताच्या सीमेवर चीनकडून 60 हजार सैन्य तैनात; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याचा दावा - अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची टोकियोमध्ये क्वाड बैठक पार पडली. या बैठकीत माईक पॉम्पिओ यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी सखोल चर्चा केली.

माईक पॉम्पिओ
माईक पॉम्पिओ
author img

By

Published : Oct 10, 2020, 5:54 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - सध्या भारत-चीन सीमेवर तणावग्रस्त वातावरण आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमेवर चीनने 60 हजार सैन्य तैनात केल्याचा दावा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी केला आहे. तसेच, त्यांनी वाईट वागणुकीवरून चीनवर टीका केली. याचबरोबर चीन क्वाड देशांसाठी (अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान) धोका असल्याचे ते म्हणाले. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून पहिल्यांदा क्वाड देशांची परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेनंतर देण्यात आलेल्या एका मुलाखतीमध्ये ते बोलत होते.

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची टोकियोमध्ये क्वाड बैठक पार पडली. या बैठकीत माइक पॉम्पिओ यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी सखोल चर्चा केली. इंडो पॅसिफिक महासागर परिसरात शांतता, सुरक्षितता आणि समृद्धी कायम ठेवण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले. एस. जयशंकर यांच्यासोबत झालेली चर्चा सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या बेकायदेशीर कारवाया आणि वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच क्वाड नेटवर्क सतर्क झाले आहे. चीनच्या कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी चार देशांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. दक्षिण चिनी समुद्रात चीनचे अतिक्रमण सुरू आहे. त्यामुळे क्वाड देशांनी चिनविरोधात कठोर भूमिक घेतली आहे. वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर तर क्वाड नेटवर्कने चीनविरोधात जास्त कडक धोरण स्वीकारले आहे. तसेच शेजारी देशांसोबत चीनचे संबंध जास्त ताणले आहेत.

काय आहे क्वाड नेटवर्क? चिनी प्रभावाला रोखण्यासाठी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे चार देश एकत्र आले आहेत. संपूर्ण दक्षिण चीन समुद्र चीनच्या मालकीचा असल्याचा दावा चीनने केला आहे. त्यामुळे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश क्वाड नेटवर्कमधील महत्त्वाचे देश आहेत. चीनसोबत युद्धाची वेळ आली चीनला घेरण्यासाठी क्वाड नेटवर्क मिळून काम करण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.