न्यूयॉर्क - जनरल चार्ल्स क्यू. ब्राऊन ज्यूनिअर यांची अमेरिकेच्या सैन्य सेवेतील प्रमुख अधिकारी म्हणून एकमताने निवड करण्यात आली. यावर अमेरिकेच्या सिनेटने मंगळवारी शिक्कामोर्तब केले. ते अमेरिकेच्या सैन्य सेवेतील प्रमुख म्हणून काम पाहणारे पहिले कृष्णवर्णीय अधिकारी आहेत.
मिनियापोलीसमधील पोलीस कोठडीत जॉर्ज प्लॉइडच्या हत्येनंतर ट्रम्प प्रशासन आणि गौरवर्णीय सिनेट सदस्यांकडून ब्राऊन यांची नियुक्ती करण्यात आली.
ब्राऊन यांची नुकतेच यूएस पॅसिफिक हवाई दलाचे कमांडर म्हणून काम पाहिले आहे. ते फायटर पायलट आहेत. त्यांनी 130 लढायांमध्ये सहभागी होत 2900 तास त्यांनी हवाई उड्डाण केले आहे. ब्राऊन यांनी आरओटीसी या प्रोग्राममध्ये टेक्सास टेक युनिव्हर्सिटीतून पदवीचे शिक्षण घेतले. आतापर्यंत त्यांनी हवाईदलात वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. यासोबतच त्यांनी यूएस हवाई दलाच्या शस्त्रास्त्रे शाळेत एफ - 16 या लढाऊ विमानाचे प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे.
शुक्रवारी त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात वाशिंक पक्षपातीचे जीवन जगण्याचे वर्णन केले आणि गौरवर्णीय समाजात वावरण्यासाठीचा संघर्ष याचे वर्णन केले आहे.
काय म्हणाले ब्राऊन?
त्यात ते म्हणाले, मी माझ्या एअरफोर्सच्या कारकिर्दीबद्दल विचार करत आहे. ज्याठिकाणी, मी एकटा वरिष्ठ अधिकारी म्हणून माझ्या आफ्रिकन अमेरिकन स्क्वॅड्रनमध्ये कार्यरत होतो. विशेष म्हणजे एकटा आफ्रिकन अमेरिकन म्हणून रूममध्येही एकटाच होतो, असेही ते यावेळी कच्च्या स्वरात म्हणाले.
माझ्या छातीवर समान पंख असलेले समान फ्लाइट सूट परिधान करण्याबद्दलही मी विचार करत आहे. त्यावेळी दुसऱ्या एका सैन्यदलातील सदस्याने विचारणा केली, काय तुम्ही पायलट आहात?, अशी आठवणही त्यांनी सांगितली.
21 टक्के आफ्रिकन अमेरिकन लोक सैन्यात सर्वात वैविध्यपूर्ण आहे. तर मरीन कॉर्प सर्वात कमी 10 टक्क्यांसह आहे. कृष्णवर्णीय लोकांचा नेव्हीत 17 टक्के तर हवाई दलात 15 टक्के पेक्षा कमी भाग आहे.
मात्र, अॅक्टिव्ह ड्य़ूटी सैन्यात रँकवर आधारित मोठ्या प्रमाणात वांशिक विभाजन आहे. क्टिव्ह ड्यूटीत 19 टक्के कृष्णवर्णीय आहेत. मात्र, त्यातील फक्त 9 टक्के जण अधिकारी पदावर आहेत. त्यापैकी फक्त 71 जण जनरल किंवा फ्लॅग ऑफिसर्स, ज्यांना एक ते चार स्टार आहेत. त्यातही फक्त दोन जणांना फोर स्टार रँक आहे.