रिओ दी जनैरो - ब्राझीलमधील नित्रोई शहरात वंशद्वेष आणि पोलिसांच्या हिंसाचाराविरोधात नागरिकांनी निदर्शने केली. या निदर्शनांमध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला होता. राष्ट्राध्यक्ष जॅर बोल्सनारो यांच्या धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अमेरिकेप्रमाणे ब्राझिलमध्येही वेळोवळी कृष्णवर्णींयांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ 'ब्लॅक लाईव्हस् मॅटर' असे लिहिलेले फलक घेऊन आज निदर्शने केली गेली. २०१८ मध्ये खोट्या आरोपांखाली अटक करून मार्कोस दे सुसा या मुलाची पोलिसांनी हत्या केली होती. त्या मुलाची आई ब्रुना मोझी यांनीही या निदर्शनांमध्ये सहभाग घेतला होता.
गेल्या दोन वर्षांमध्ये रिओ दी जनैरोत पोलीस कारवायांमध्ये मृत्यू होणाऱया कृष्णवर्णीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरि सुरक्षा संस्थेच्या अहवालानुसार २०२० च्या पहिल्या चार महिन्यांमध्ये ६०६ नागरिकांची हत्या झाली आहे.