वॉशिंग्टन : अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. मात्र त्यापूर्वीच डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी इतिहास रचला आहे. ते आतापर्यंतचे सर्वाधिक मतं मिळवणारे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार ठरले आहेत. यापूर्वी हा विक्रम माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावावर होता.
सात कोटींहून अधिक मतं..
बायडेन यांना आतापर्यंत ७ कोटी, ३४ लाख, ८१ हजार, ४८२ मतं मिळाली आहेत. जी इतिहासातील कोणत्याही अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांपेक्षा अधिक आहेत. यापूर्वी ओबामा यांना मिळालेल्या मतांपेक्षाही सुमारे साडेतीन लाख मतांनी बायडेन पुढे आहेत. ओबामा यांना २००८ मध्ये ६ कोटी, ९४ लाख, ९८ हजार, ५१६ मतं मिळाली होती.
ट्रम्पनीही मोडला ओबामांचा रेकॉर्ड..
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ओबामांचा २००८चा विक्रम मोडला आहे. त्यांना आतापर्यंत 6 कोटी, 96 लाख, 18 हजार, 716 मतं मिळाली आहेत. ते सध्या बायडेनपेक्षा ३८ लाख, ६२ हजार, ७६६ मतांनी मागे आहेत.
हेही वाचा : जॉर्जिया आणि मिशिगनमध्ये ट्रम्पना धक्का; न्यायालयाने याचिका फेटाळल्या