वॉश्गिंटन डी. सी - अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. यात जो बायडेन विमान शिडीच्या पायऱ्या चढतेवेळी तीनवेळा घसरल्याचा पाहयला मिळाले. सुदैवानं त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, अशी माहिती व्हाइट हाउसकडून माध्यमांना देण्यात आली आहे.
-
President Joe Biden twice lost his footing while climbing up the steps to Air Force One https://t.co/8zaZ7etqxr pic.twitter.com/N5K5J0OdLK
— Reuters (@Reuters) March 19, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">President Joe Biden twice lost his footing while climbing up the steps to Air Force One https://t.co/8zaZ7etqxr pic.twitter.com/N5K5J0OdLK
— Reuters (@Reuters) March 19, 2021President Joe Biden twice lost his footing while climbing up the steps to Air Force One https://t.co/8zaZ7etqxr pic.twitter.com/N5K5J0OdLK
— Reuters (@Reuters) March 19, 2021
जो बायडेन शुक्रवारी अटलांटाच्या दौऱ्यावर निघाले होते. ते आशियाई-अमेरिकी समुदायाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. एअरफोर्स वन या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठी असलेल्या विशेष विमानाची शिडी ते चढत होते. यावेळी शिडीच्या पायऱ्या चढताना एक किंवा दोन नाही तर तब्बल तीन वेळा त्यांचा तोल गेला आहे. मात्र, त्यांनी स्व:ताला सावरले. पूर्ण पायऱ्या चढून होताच मागे वळून सलाम केला आणि विमानात जाऊन बसले.
-
Get well soon #PMModi #modi pic.twitter.com/Ag7OHdUIj7
— Meer (@itsmeerhere) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Get well soon #PMModi #modi pic.twitter.com/Ag7OHdUIj7
— Meer (@itsmeerhere) December 14, 2019Get well soon #PMModi #modi pic.twitter.com/Ag7OHdUIj7
— Meer (@itsmeerhere) December 14, 2019
जो बायडेन शिडी चढत होते. तेव्हा वारा जोरात सुरू होता. त्यामळे त्यांचा तोल गेला. मात्र, पूर्णतः स्वस्थ असून 100 टक्के ठिक आहेत, असे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान अमेरिकेचे एअरफोर्स वन हे विमान जगातील सर्वात सुरक्षित आणि आलिशान समजलं जातं. एअरफोर्स वन हे अमेरिकेच्या सर्वोच्च लष्करी सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. बोईंग 747-200 बी सीरीज प्रकारातील हे विमान आहे. याच विमानाने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल झाले होते.
यापूर्वीला पायाला दुखापत झाली होती -
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जो बायडेन यांचा कुत्र्यासोबत खेळताना पाय फ्रॅक्चर झाला होता. 'मेजर' नावाच्या कुत्र्यासोबत खेळत असताना, जो बायडन यांचा पाय मुरगळला आणि ते पडले होते. 78 वर्षांचे जो बायडन अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत.
जो बायडेन यांच्याविषयी -
डेमॉक्रॅटिक पक्षाचे दीर्घकाळ सदस्य राहिलेले जो बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. 1972 मध्ये सीनेटवर निवडून जात सर्वात कमी वयाचा सीनेटर होण्याचा विक्रम त्यांनी केला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे पाच दशके ते अमेरिकेच्या राजकारणात सक्रीय आहेत. 50 वर्षांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवलेत. ओबामा प्रशासनात सलग दोन वेळा अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी काम पाहिले
मोदींचा पायऱ्या चढताना गेला होता तोल -
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 मध्ये कानपूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गंगा घाटाला भेट दिली. यावेळी पायऱ्या चढत असताना त्यांचा तोल गेला आणि ते अडखळून पडले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हेही वाचा - दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सहकार्यवाह