ETV Bharat / international

अ‍ॅपल, गूगल, अ‍ॅमेझॉन, फेसबुक अन् टि्वटर व्हिसा निर्बंधाविरूद्धच्या लढाईत सामील - एच-१बी व्हिसा म्हणजे काय

परदेशी नागरिकांना अमेरिकेत काम करण्यासाठी दिला जाणार एच-1 बी व्हिसा 2020 च्या उर्वरीत काळासाठी रद्द करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेचा अ‌ॅपल, फेसबुक, अ‌ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि टि्वटरने पाठिंबा दर्शवला आहे.

एच-१बी व्हिसा
एच-१बी व्हिसा
author img

By

Published : Aug 12, 2020, 9:16 AM IST

वॉशिंग्टन डी. सी - परदेशी नागरिकांना अमेरिकेत काम करण्यासाठी दिला जाणार एच-1 बी व्हिसा 2020 च्या उर्वरीत काळासाठी रद्द करण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेचा अ‌ॅपल, फेसबुक, अ‌ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि टि्वटरने पाठिंबा दर्शवला आहे. यूएस चेंबर ऑफ कॉमर्स तसेच व्यापार गटांच्या संघाने ट्रम्प प्रशासनाच्या व्हिसा निर्बंधावरील निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे.

कोरोना महामारीमध्ये अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. पुन्हा उभारी घेत असलेल्या अर्थव्यवस्थेवर या नियमांचा काय परिणाम पडेल, याबाबत कंपन्यांनी सोमवारी सांगितले. अमेरिकन कामगारांना संरक्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी घेतलेला निर्णय हा त्याच कामगारांसाठी, कंपनी मालकांसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी नुकसानकारक आहे, असे अ‌ॅपल, फेसबुक, अ‌ॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आणि टि्वटरने म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर टिम कुक आणि सुंदर पिचाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नॉन-इमिग्रंट लोकांनी अमेरिकेच्या आर्थिक यशामध्ये मोठे योगदान दिले आहे. आम्ही स्थलांतरितांबरोबर उभे राहू आणि सर्वांसाठी संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करू, असे सुंदर पिचाई यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे, तर ट्रम्प यांच्या निर्णयाने आपण मनापासून दुखावले गेलो असल्याचे टिम कुक यांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एच-१बी व्हिसा वर्षभरासाठी रद्द करण्याची घोषणा केली. अमेरिकेतील लोकांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, यामुळे अमेरिकेत नोकरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या हजारो भारतीयांचे नुकसान होणार आहे.

एच-१बी व्हिसा म्हणजे काय?

एच-१बी व्हिसा हा नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे, ज्याद्वारे अमेरिकेतील कंपन्या बाहेरच्या देशांमधील एखाद्या विषयातील तज्ज्ञांना कामावर ठेवण्याची मुभा मिळते. या प्रकारच्या व्हिसाची सुरुवात १९९०मध्ये करण्यात आली. अमेरिकेतील कंपन्यांमध्ये संशोधन, अभियांत्रिकी आणि कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठी तंत्रज्ञाची आणि तज्ज्ञ कामगारवर्गाची भासणारी कमतरता पाहता, परदेशातील व्यक्तींना कामावर रुजू करण्याच्या उद्देशाने हे सुरू करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.