हैदराबाद - लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आणि देशभरात वाईन शॉप्स खुली करण्याची परवानगी दिल्याबरोबर, राज्यातील दारू दुकानांसमोर मद्यपींच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. मात्र, पोलिसांना ही अभूतपूर्व गर्दी रोखण्यासाठी आणि दारूदुकानांसमोरील लोकांना नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित कृती करावी लागली. मात्र, कोविड-१९ अत्यंत घातकरित्या देशात पसरत असल्याने मद्य सेवन योग्य नाही.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ विषाणु मद्य सेवन करणाऱ्यांच्या शरिरात झपाट्याने पसरत असल्याने दारूची सवय सोडा, असा इशारा दिला आहे. तसेच मद्यग्राहक झिंगलेल्या अवस्थेत असताना त्याच्या वर्तनामुळे सोसायटीत विषाणुचा सहज प्रसार करण्यास कारण ठरू शकतो, असेही उघड झाले आहे.
विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिक मद्यप्राशन केल्याने मानवी शरिरातील प्रतिकारशक्ति कमी होऊन न्यूमोनिया होण्याचा धोका असतो. २०१५ मध्ये केलेल्या एका अभ्यासाने हे उघड केले असून द जर्नल अल्कोहोल रिसर्चमध्ये तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. रक्तात अल्कोहोलचे प्रमाण जास्त झाले की बॅक्टेरिया आणि विषाणुशी लढण्याची शरिरातील नैसर्गिक संरक्षण प्रणाली नष्ट होते.
यासोबतच, अधिक मद्यप्राशनामुळे कुटुंबात घरगुती हिंसाचार होतो तसेच समाजात अडचणी निर्माण होतात. अशा घटनांमध्ये महिला आणि मुले ही दोघेही जखमी होण्याचा धोका असतो. अशा घटनांमुळे तत्काळ मृत्यु होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी फेब्रुवारीत मद्यपानामुळे घडलेल्या घटना आपल्या प्राधान्याच्या यादीत समाविष्ट केल्या आहेत. यामुळे जगभरात मद्याच्या विक्रीला आळा बसण्यास चालना मिळेल, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. दारूविक्रीला आळा घालून विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी सरकारांनी आवश्यक उपाययोजना करावी, असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : कोरोना संकट: 'चीनकडे ६०० अब्ज डॉलर नुकसान भरपाईचा दावा करा'